• होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE VIDEO: नाशिकमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; एक जण जखमी
  • EXCLUSIVE VIDEO: नाशिकमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; एक जण जखमी

    News18 Lokmat | Published On: Feb 17, 2019 02:47 PM IST | Updated On: Feb 17, 2019 04:19 PM IST

    नाशिक, 17 फेब्रुवारी : नाशिकच्या गंगापूर रोडवरील सावरकर नगर भागात पुन्हा एका बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एका वन कर्मचाऱ्याला त्यानं गंभीर जखमी केलं आहे. इथल्या गणपती मंदिराजवळ तो नागरिकांना दिसला. तसंच एका बंगल्याच्या पोर्चमध्ये लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यातही तो कैद झाला. सावरकर नगर धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा EXCLUSIVE VIDEO न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे. मिळेल त्या दिशेने तो धावत सुटला असून, दिसेल त्याच्यावर तो झडप घालत आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे स्थानिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. या भागात नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहनदेखील वनविभागानं केलं आहे. 25 जानेवारीला याच भागात एका बिबट्याला वनविभागानं पकडलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading