नागपूर, 11 फेब्रुवारी : नागपुरात पेट्रोल संपलेल्या बाईकसाठी पेट्रोल मागितल्यावर वाद झाल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकू हल्ला केला. दीपक गौर असं जखमी तरुणाचं नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी रात्री नागपुरातील गोळीबार चौकात घडलेली ही घटना cctv मध्ये कैद झाली आहे. दीपक गौर याच्या बाईकमधले पेट्रोल संपले म्हणून त्याने गोळीबार चौकात थांबून त्याच परिसरातील मयूर पराते नामक तरुणाकडे पेट्रोल मागितले. या मुद्द्यावरून दोघामध्ये वाद झाला आणि त्यामध्येच मयूरने दीपकवर चाकू हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं.