VIDEO : महिलांचे कपडे परिधान करून दारुड्याचा हाय होल्टेज ड्रामा; बस स्टँडवर घातला धिंगाणा

VIDEO : महिलांचे कपडे परिधान करून दारुड्याचा हाय होल्टेज ड्रामा; बस स्टँडवर घातला धिंगाणा

एका मद्यधुंद व्यक्तीने महिलांचे कपडे परिधान (drunk man wear ladies dress) करून बस स्टँडवर तुफान राडा घातला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल (Viral Video)होतं आहे.

  • Share this:

पलवल, 20 मार्च: खरंतर दारुच्या नशेत असलेल्या व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. पलवल येथील एका व्यक्तीने दारुच्या नशेत बस स्टॅंडवर तुफान राडा घातला आहे. विशेष म्हणजे त्याने यावेळी महिलांचे कपडे परिधान केले होते. महिलांचे कपडे परिधान केलेल्या या मद्यधुंद व्यक्ती (Drunk man wear ladies dress) बराच काळ बस स्टँडवर (Bus stand) पडून राहिला होता. दरम्यान तो एका बसच्या पुढे पडला होता, त्यामुळे वाहतुकीत अनेक अडचणी आल्या. (Viral video)

त्यामुळे कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला रस्त्यावरून बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. पण तो कोणालाचं ऐकला नाही. त्याने त्याचा हाय होल्टेज ड्रामा तसाच चालू ठेवला. येथील एका बघ्याने संबंधित मद्यधुंद व्यक्तीचा नंगानाच आपल्या मोबाईलमध्ये टिपला त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. महिलेचे कपडे परिधान केलेल्या या मद्यपीला अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो काही बसच्या समोर झोपलेला काही उठायला तयार नव्हता. थोड्या वेळाने त्याची नशा थोडी कमी झाल्यानंतर तो उठला आणि थेट बसच्या समोरच बसला. खूप वेळ चाललेल्या हाय होल्टेज ड्राम्यानंतर त्याने बससाठी रस्ता मोकळा केला. यानंतर बसमध्ये बसलेल्या प्रवाश्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

खरंतर हरियाणाच्या या पलवल बस स्थानकावर मद्यपीने धिंगाणा घालण्याच पहिलचं प्रकरण नाही. यापूर्वीही अनेक मद्यपींनी या बस स्थानकावर अशा प्रकारचा हाय होल्टेज ड्रामा केला आहे. ज्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरं जावं लागतं. विशेष म्हणजे पलवल बस स्थानकाच्या आत एक पोलीस चौकी देखील आहे. असताना देखील संबंधित मद्यपीचा रस्त्यावर धिगांणा सुरु झाल्यानंतरही कोणताही पोलीस याठिकाणी आला नाही.

हे ही वाचा -VIDEO: मुलींच्या जीन्सवर टिप्पणी करणं रोड रोमिओला भोवलं; भररस्त्यात तरुणीने दिला

त्यामुळे पलवल बस स्थानकावर दारु पिऊन राडा घालणाऱ्या अशा मद्यपींवर पोलीस कारवाई करतील की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण याचा त्रास केवळ बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनाच होतो, असं नाही. मद्यपींच्या अशा राड्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.

Published by: News18 Desk
First published: March 20, 2021, 10:43 PM IST

ताज्या बातम्या