मुंबई, 20 जून : कुत्रा पिसाळला अन् वाघासारखा माणसावर तुटून पडला. हो हे खरं आहे. पिसाळलेल्या कुत्र्यानं धुमाकूळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हिंस्त्र कुत्रा चावा घेत असल्याचा व्हिडिओ मुंबईतला असल्याचा दावा केला जात आहे. त्या व्हायरल व्हिडिओची फॅक्ट न्यूज18 लोकमतनं शोधून काढली.