स्कायमेट हवामान कंपनी आणि एचडीएफसीच्या पिकविमा कंपनीनं मिळून शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप देवगड तालुक्यातल्या आंबा उत्पादकांनी केलाय. गेल्यावर्षी पाऊस आणि अतितापमानानं आंब्याचं नुकसान झालं असताना देवगड तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याला विमा कंपनीकडून एक छदामही मिळाला नाहीए. यावर आमचे प्रतिनिधी दिनेश केळुस्कर यांचा हा शेतकऱ्यांसोबतचा थेट आंबा बागेतून साधलेला खास संवाद..