नंदूरबार, 03 जानेवारी : नंदूरबार जिल्ह्यात आज धडगाव आणि बोरद येथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन सभांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीवर एकच हल्लाबोल केला. विश्वासघाताने तयार झालेल्या या सरकारने पहिला विश्वासघात अवकाळी पावसाने त्रस्त शेतकर्यांचा केला. त्यांना मदत दिली नाही. दुसरा विश्वासघात कर्जमाफीतून त्यांना वगळून केला आणि आता 10 रूपयांत भोजन देण्याचे सांगून त्यालाही अटी लावल्या, अशी टीका फडणवीसांनी केली.