• VIDEO : भयंकर अपघात, कारसह चालकाचे झाले 2 तुकडे

    News18 Lokmat | Published On: Jan 28, 2019 11:13 PM IST | Updated On: Jan 28, 2019 11:46 PM IST

    29 जानेवारी : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कारचा वेग नियंत्रणात न राहिल्यानं चालकाला आपला जीव गमवावा लागला. टेंभूर्णी जवळील वरवडे टोल पुढे आल्यावर ही वेगात आलेली कार एका पुलाला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, यात कारचे दोन तुकडे झाले. कारचा एक तुकडा पुलावर आणि दुसरा पुलाखाली पडला होता. चालकाचा यात जागीच मृत्यू झाला असून त्याच्या मृतदेहाचेही कारसोबत तुकडे झाले. चालकाचे नाव सिकंदर शेख असून तो अकलुजचा राहणार होता. ही मारुती सुझुकी कार होती आणि अपघातात या कारचे दोन तुकडे झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी