मुंबई, 23 जानेवारी: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले. भाजपने मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी वेगळा मार्ग स्वीकारला. पण आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही. आमचं अंतरंग भगवंच आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.