• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : अडीच वर्षात पूर्ण होणार मुख्यमंत्र्यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट'
  • Special Report : अडीच वर्षात पूर्ण होणार मुख्यमंत्र्यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट'

    News18 Lokmat | Published On: Feb 1, 2019 06:06 PM IST | Updated On: Feb 1, 2019 06:06 PM IST

    नागपूर, 1 फेब्रुवारी : देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आजपासून सुरूवात झाली आहे. दहा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्गाच्या कामाचा श्रीगणेशा नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील शिवमडका गावात झाला. यानिमित्तानं या गावात मोठमोठ्या मशिनरी, गाड्या आणि असंख्य कामगार दाखल झाले आहेत. जमीन सपाटीकरण, रस्त्याचे मार्किंग, मशिनरी जोडणं, मुरुम टाकून कच्चा रस्ता बनविणं अशा वेगवेगळ्या कामांना आजपासून सुरवात करण्यात आली. पुढच्या अडीच वर्षात महामार्गाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन 701 कि.मी.च्या समृद्धी महामार्गाचं हे काम सुरू करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading