• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं किल्ले शिवनेरी वरील UNCUT भाषण
  • VIDEO: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं किल्ले शिवनेरी वरील UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 10:46 AM IST | Updated On: Feb 19, 2019 10:46 AM IST

    19 फेब्रुवारी : मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती आज किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती निमित्त मोठा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवप्रेमिंना संबोधित केलं. छत्रपती शिवाजी माहाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ''मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवरील 80 टक्के केसेस मागे घेतल्या असून, उर्वरित केकेसदेखील मागे घेणार असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याचं काम सुरू आहे, '' असं त्यांनी यावेळी सांगितलं. आरबी समुद्रात तयार करण्यात येत असलेल्या महाराजांच्या स्मारकाविषयी बोलतांना, ''छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनात हिमालयापेक्षाही मोठी उंची गाठली. म्हणून खऱ्या अर्थानं शिवस्मारक बांधण्यात येत आहे. आणि सर्वसामान्यांना तेथपर्यंत जाता येईल अशी व्यवस्था राहणार आहे,'' असं त्यांनी यावेळी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading