• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ...म्हणून मुख्यमंत्र्यांनाही आवरता आला नाही रस्त्यावरची पाणीपुरी खाण्याचा मोह
  • VIDEO: ...म्हणून मुख्यमंत्र्यांनाही आवरता आला नाही रस्त्यावरची पाणीपुरी खाण्याचा मोह

    News18 Lokmat | Published On: Mar 6, 2019 11:04 AM IST | Updated On: Mar 6, 2019 03:38 PM IST

    मुंबई, 6 मार्च : गिरगाव चौपाटीला 'क्लीन स्ट्रीट फूड हब'चा दर्जा मिळाल्यानंतर याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणीपुरीच्या स्टॉलचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी पाणीपुरीचा आस्वादही घेतला. नुकत्याच केलेल्या पाहणीदरम्यान गिरगाव चौपाटीवर खाद्यपदार्थ विक्रेते स्वच्छतेचे सर्व मानक पाळत असल्याची बाब FSSAI च्या लक्षात आल्याने या चौपाटीला 'क्लीन स्ट्रीट फूड हब'चा दर्जा देण्यात आला. याठिकाणी पदार्थ शिजवण्यासाठी स्वच्छ पाणी वापरलं जातं, अन्न शिजवताना आणि वाढताना हातमोज्यांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे स्वच्छ कपडे वापरले जातात. तसंच कचऱ्याची विल्हेवाटही योग्य प्रकारे लावली जात असल्यामुळे गिरगाव चौपटीला हा दर्जा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी