मुंबई, 21 सप्टेंबर : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. लोकशाहीतील सर्वात मोठ्या महोत्सवाचे मी स्वागत करतो. प्रत्येक महाराष्ट्रीयन बंधू आणि भगिनींनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे आणि ते अमूल्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.