डहाणू तालुक्यातील बोर्डी या पर्यटनस्थळी 7वा चिकू महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात स्थानिक बागायतदार आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या चिकूच्या विविध प्रजातींचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे. याशिवाय महोत्सवात चिकू पासून बनवलेले विविध पदार्थ देखील आहेत. चिकू कतली, चिकू चॉकलेट, चिकू वेफर, चिकू लोणच, चिकू बर्फी, चिकू पावडर, चिकू चिप्स, चिकू हलवा अशा चिकू पासून बनवालेल्या विविध पदार्थ येथे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या महोत्सवात चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी 233 स्टॉल लावले असून, या माध्यमातून स्थानिकाना रोजगार उपलब्ध झाला आहे. चिकू महोत्सवाचा आढावा घेतलाय न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी विजय राऊत यांनी...