मुंबई, 11 फेब्रुवारी : मोठय़ा प्रतीक्षेनंतर चेंबूर ते थेट सातरस्त्यापर्यंत मोनोरेल धावणार असल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, मोनोसाठी लागणारे सुटे पार्ट नुकतेच मुंबईत पोहचल्याने जादा गाड्या चालवणे शक्य होणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत 20 मिनिटाला एक याप्रमाणे दररोज 130 मोनोरेल धावू शकणार आहेत. लवकरच सुरू होणाऱया मोनो रेलच्या चेंबूर ते सातरस्ता या प्रवासादरम्यान 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये आणि 40 रुपये असे टप्पानिहाय मोजावे लागणार आहेत. त्यामुळे चेंबूरहून सातरस्तापर्यंत केवळ 40 रुपयांमध्ये प्रवाशांना आरामात पोहचता येणार आहे.