• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : डॉक्टरला दाखवायचं आहे, असं सांगून बाळाला घेऊन पसार झाली महिला
  • VIDEO : डॉक्टरला दाखवायचं आहे, असं सांगून बाळाला घेऊन पसार झाली महिला

    News18 Lokmat | Published On: Dec 9, 2018 05:44 PM IST | Updated On: Dec 9, 2018 05:44 PM IST

    चंद्रपूर, 9 डिसेंबर : चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक 2 महिन्याचं बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आर्यन साव असं चोरीला गेलेल्या मुलाचं नाव आहे. चंद्रपूर शहरातील हिंगलाज भवानी मंदिर परिसरात साव कुटुंब वास्तव्याला आहे. काल (शनिवारी) एक 35 ते 40 वर्षाची अनोळखी महिला बाळाच्या घरी आली आणि त्याच्या आईला फॅमिली प्लँनिंगचं ऑपरेशन करण्याच्या बहाण्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेली. काही वेळाने ती महिला बाळाला डॉक्टरला दाखवायचं आहे, असं सांगून आई पासून बाळाला घेऊन पसार झाली. पोलिसांनी हॉस्पिटल मधील CCTV फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे पोलीस आरोपी महिलेचा आणि बाळाचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading