S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • News18 Lokmat Impact : राहीबाईंना मिळणार हक्काचं घर; अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहाणी
  • News18 Lokmat Impact : राहीबाईंना मिळणार हक्काचं घर; अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहाणी

    Published On: Dec 24, 2018 10:58 PM IST | Updated On: Dec 24, 2018 10:58 PM IST

    अहमदनगर, 24 डिसेंबर : न्यूज18 लोकमतच्यावतीने आयोजित 'सन्मान बळीराजाचा-2018' या पुरस्कार सोहळ्यातील विजेत्या राहीबाई पोपेरे यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेनं कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिलं पाऊल उचललं. चंद्रकात पाटील यांचे स्वीय सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंते, कृषी अधिकारी आणि बाएफ संस्थेच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. राहीबाईंना जागतिक दर्जाची पर्यावरणपूरक बीज बँक कम प्रशिक्षण केंद्र बांधून देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. न्यूज18 लोकमतच्यावतीने 15 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या 'सन्मान बलीराजाचा 2018' या पुण्यातील कार्यक्रमात कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहीबाईंना आश्वासन दिलं होतं. त्यांची आता लवकरच पूर्तता होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close