सुरत, 29 जानेवारी : गुजरातमधील सुरत येथे अंगावर शहारे आणणारी एक दुर्घटना घडली आहे. टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेमुळे एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार चौक क्रॉस करत होता. मात्र, तेवढ्यात विरुद्ध दिशेनं भरधाव आलेल्या एका टेम्पोने त्यास जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की तो दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना चौकातील एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धडक दिल्यानंतर टेम्पोने दुचाकीस्वारास काही अंतरापर्यंत अक्षरशः फरफटत नेल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय.