• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाशिकमध्ये उमेदवाराचा प्रताप, निवडणूक अधिकाऱ्यांना फुटला घाम!
  • VIDEO : नाशिकमध्ये उमेदवाराचा प्रताप, निवडणूक अधिकाऱ्यांना फुटला घाम!

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 05:17 PM IST | Updated On: Apr 9, 2019 05:17 PM IST

    प्रशांत बाग, नाशिक, 09 एप्रिल : नाशिकमध्ये एका उमेदवारानं निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच कामाला लावलं. अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करणारे शिवाजी वाघ यांनी चक्क दहा हजार रुपयांची चिल्लर (नाणी) आणली होती. आज अर्ज दाखल करताना अखेरचा दिवस आणि त्यात वेळ संपत आली असताना उमेदवारानं हा प्रताप केला. त्यामुळे नाणी मोजताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. यात एक रुपयाची 1900, दोन रुपयांची 1450, पाच रुपयांची 640, दहा रुपयांची 200 अशी एकूण 10 हजार अनामत रक्कम जमा केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी