• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...आणि पेटलेला मिनी ट्रकच 'त्याने' अग्निशमन दलाच्या गाडीपर्यंत पळवला
  • VIDEO :...आणि पेटलेला मिनी ट्रकच 'त्याने' अग्निशमन दलाच्या गाडीपर्यंत पळवला

    News18 Lokmat | Published On: Feb 4, 2019 05:28 PM IST | Updated On: Feb 4, 2019 05:35 PM IST

    अमरावती, 4 फेब्रुवारी : आगीची घटनांमध्ये अग्निशम दालाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होतात आणि आगिवर नियंत्रण मिळवतात. पण, काल रात्री अमरावतीत याच्या विरूद्ध आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडला. रेल्वेस्थानक चौकातून इर्विनकडे जाणाऱ्या एका मिनीट्रकवरील ताडपत्रीने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती लगेच अग्निशमन देण्यात आली. पण बंब येण्यास विलंब होत असल्याचं लक्षात येताच, चालकाने पेटता ट्रक स्वतः चालवत अग्निशमन दलाच्या गाडीपर्यंत नेला. अमरावतितल्या रस्त्यांवरून धावणारा हा बर्निंग ट्रक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एखाद्या चित्रपटात दाखवतात तसं हे दृश्य होतं. अखेर इर्विन चौकात दोन्ही गाड्यांची गाठ पडली आणि तेथेच मिनीट्रकला लागलेली आग विझविण्यात आली. पण हा धक्कादायक प्रकार जीवावरही बेतू शकला असता...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी