• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL VIDEO : बिट जमादाराने चक्क आरोपीकडून स्वीकारली लाच
  • VIRAL VIDEO : बिट जमादाराने चक्क आरोपीकडून स्वीकारली लाच

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 07:06 PM IST | Updated On: Dec 3, 2018 07:06 PM IST

    बुलडाणा, 3 डिसेंबर : पोलीस प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडे उडवणारा एक व्हिडिओ सद्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. खामगाव तालुक्यातील पिंपळगावराजा पोलीस स्टेशनचे बिट जमादार निवृत्ती बाठे हे काही आरोपींकडून चक्क पोलीस ठाण्यातच पैसे स्वीकारताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपळगावराजा हद्दीतील भंडारी येथे एकाच समाजातील दोन गटात हाणामारी झाली होती. याप्रकरणी गुन्हे न नोंदवण्यासाठी आणि पुढे कारवाई न करण्यासाठी बिट जमदार निवृत्ती बाठे हे लाच स्वीकारताना दिसत आहेत. एवढच नव्हे तर, पैसे स्वीकारल्यानंतर त्यांनी आरोपींना धीर देखील दिला. ''तुम्हाला काही होणार नाही आणि हे प्रकरण वाढणार नाही'', असं सांगताना ठाणेदारांचाही उल्लेख या महाशयांनी वारंवार केला. त्यामुळे खामगाव पोलीस यंत्रणेची अब्रू पुन्हा एकदा वेशीवर टांगल्या गेलीं आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी