S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल
  • VIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2018 11:01 PM IST | Updated On: Nov 12, 2018 11:01 PM IST

    बुलडाणा, 12 नोव्हेंबर : जिल्ह्यातील खामगाव वन विभागांर्तगत वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळ करत स्टंटबाजी करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे विषारी सापासोबत स्टंटबाजी करताना एका युवकाचा व्हिडीओ सद्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. वन्य प्राण्यांची छेड काढणं हा गुन्हा आहे, हे माहिती असतानासुद्धा जंगलात अशा प्राण्यांचा शोध घेवून, त्यांना पकडून त्यांच्यासोबत खेळ केल्या जातोय. या जीवघेण्या प्राण्यांसोबत असे स्टंट करून हा युवक स्वतः बरोबर या सापाचा सुद्धा जीव धोक्यात घालत आहे. या संपूर्ण प्रकरणावर वन्य प्रेमींमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या युवकाचा शोध घेऊन आपण कारवाई करणार असल्याचं वन विभागाकडून ऑफ कॅमेरा बोललं जातंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close