• VIDEO : त्या दिवशी बुलंद शहरात नेमकं काय घडलं?

    News18 Lokmat | Published On: Dec 5, 2018 10:01 PM IST | Updated On: Dec 5, 2018 10:01 PM IST

    बुलंदशहर, 05 डिसेंबर : उत्तरप्रदेशातल्या बुलंदशहर इथं गोमांस सापडल्याच्या अफवेवरून हिंसाचार उफाळला होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. बुलंदशहर जवळच्या एका शेतात मांसचे तुकडे सापडले. गायीची हत्या करून तिचे तुकडे केल्याची अफवा लगेच पसरली त्यामुळं नागरिक संतप्त झाले. त्यांनी ते मांस एका ट्रॅक्टरमध्ये टाकून मुख्य रस्ता जाम केला. संतप्त नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी पोलिस आणि नागरिकांमध्ये चकमक उडाली. त्या दिवशी बुलंद शहरात नेमकं काय घडलं याचा व्हीडीओ न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी