नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नोकरदर वर्गाला मोठा दिलासा दिलाय. ५ ते साडे सात लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांना आता १० टक्के आयकर भरण्याचा पर्याय आहे. पण मग अन्य कुठलीही सूट किंवा लाभ घेता येणार नाही. जुन्या कर प्रणालीत राहण्याचा पर्याय करदात्यांना देण्यात आला आहे. ५ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही कर भरावा लागणार नाही. कृषी कर्जांसाठी सरकारनं १५ लाख कोटींची तरतूद केलीये. तर २०२५ पर्यंत देशात १०० नवी विमानतळं उभारण्याची घोषणाही करण्यात आलीये. तसंच एलआयसीबद्दल मोठी घोषणा केली आहे.