त्या आल्या... आणि त्यांनी जिंकलं !बीएसएफ महिला पथकाच्या कवायती

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी बीएसएफकडून चित्तथरारक कवायती सदर केल्या जातात. पण यंदा त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच बीएसएफच्या महिलांनी यावर्षी या कवायती

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 26, 2018 02:22 PM IST

त्या आल्या... आणि त्यांनी जिंकलं !बीएसएफ महिला पथकाच्या कवायती

26 जानेवारी: यंदा  प्रजासत्ताक दिनी  दिल्लीत राजपथावर झालेल्या  संचलनाच पहिल्यांदाच बीएसएफच्या महिलांनी कवायती केल्या. या कवायतीला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी बीएसएफकडून चित्तथरारक कवायती सदर केल्या जातात. पण यंदा त्यातलं  वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच  बीएसएफच्या महिलांनी यावर्षी या कवायती साकारल्या.सीमा भवानी असं या पथकाचं नाव होतं. रॉयल एन्फिल्ड बुलेटवरून दाखल होत या 27 महिल्यांनी 16 प्रकारच्या कवायती दाखवल्या.  या कवायतींनी सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं. दुचाकींवर एकाहून अधिक महिलांनी  वेगवेगळ्या प्रकारच्या कवायती सादर केल्य. काही दुचाक्यांवर दोन-तीन तर काहींवर पाच महिला होत्या.मुख्य म्हणजे हे संचलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आलं.  यामुळे भारतातल्या स्त्री सामर्थ्याचं दर्शन देशाला घडलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2018 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close