S M L
  • स्कूल चले हम...असा जीव धोक्यात घालून ?

    Published On: Jul 11, 2018 10:49 PM IST | Updated On: Jul 11, 2018 10:50 PM IST

    : आपल्या देशात काही गावांमध्ये शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागतो. गुजरातच्या खेडा जवळ पुलाचं काम अपूर्ण राहिल्यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. यामध्ये शाळेला जाणाऱ्या लहान मुलांचाही समावेश आहे. 10 किलोमीटरचं अंतर चालावं लागू नये, म्हणून हे लोक पुलाच्या पिलरवरून नदी पार करून जातात. हे असं पूल पार करणं अत्यंत धोकादायक असनूही शाळेला जाणारी लहान मुलं हा पूल पिलर वरून पार करत आहेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं असता, पावसामुळे काम थांबलंय पण हे काम आता आम्ही त्वरित सुरू करतोय, असं उत्तर त्यांनी दिलं. याच हलगर्जीपणामुळे आणि सिस्टमच्या आळशीपणामुळे देशात याआधी अनेक जणांना आपला जीव गमवावा लागलाय. पण अपघात झाल्याशिवाय आपल्या देशातली यंत्रणा हलतच नाही का, असा सवाल इथल्याही नागरिकांना पडतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close