• VIDEO : गणपती बाप्पाला चक्क पुस्तकांचा प्रसाद!

    News18 Lokmat | Published On: Sep 18, 2018 06:20 PM IST | Updated On: Sep 18, 2018 06:20 PM IST

    अंबरनाथ, 18 सप्टेंबर - अंबरनाथच्या शिवधाम कॉम्प्लेक्समधील गणपती बाप्पाच्या समोर प्रसाद म्हणून मोदक न ठेवता चक्क पुस्तके ठेवली जात आहेत. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणार्यांनी प्रसाद, हार फुले न आणता पुस्तके आणावीत असे आवाहन अंबर भरारी या संस्थेने केलंय. त्यालाच प्रतिसाद देत सुनील चौधरी यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी येणारे बाप्पा समोर प्रसाद म्हणून पुस्तके वाहत आहेत. अंबरनाथ शहराला पुस्तकांचं गाव करण्याच्या उद्देशाने 'अंबर भरारी' या संस्थेने शहरात १०० वाचनालये सुरू करण्याचा निश्चय केलाय. त्याकरिता शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा आणि आशा विविध क्षेत्रातील पुस्तके गोळा करण्याचे काम गेल्या दिड महिन्यापासून सुरू आहे. संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी आतापर्यंत १५ हजार पुस्तके अंबर भरारी कडे जमा केली आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी