आरके स्टुडिओ, चंदेरी दुनियेतली ही सोनेरी आठवण.1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1948 मध्ये शोमॅन राज कपूर यांच्या स्वप्नाची पूर्तता झाली ती आरके स्टुडिओच्या रूपानं. भारतीय सिनेमाच्या सुवर्ण इतिहासातील ही दंतकथा. गेली 7 दशकं आरके स्टुडिओनं चित्रपट सृष्टीतील अनेक पिढ्या पाहिल्या. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आरके स्टुडिओमधील काही भाग आगीने जळून खाक झाला.आर.के. स्टुडिओ आता विकण्यात येणार आहे.हा पांढरा हत्ती पाळणं आता शक्य नाही, त्यामुळे स्टुडिओ विकणं योग्य ठरेल असं ऋषी कपूर यांनी सांगितलं. आरके स्टुडिओ आता राहणार नाही पण राहतील या सुवर्णकाळाच्या कधीही न भंगणाऱ्या सोनेरी आठवणी.