बॉलिवूड सोडून टोमॅटोची शेती करतायत धर्मेंद्र, समोर आला हा VIDEO

बॉलिवूड सोडून टोमॅटोची शेती करतायत धर्मेंद्र, समोर आला हा VIDEO

बॉलिवडूचे स्टार अभिनेते सध्या कशात रमतात हे पाहून तुम्हालाही भारी वाटेल.

  • Share this:

मुंबई, 16 मार्च : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ‘ही मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र सध्या सिनेजगतापासून दूर आहेत. पण नेमकं काय करतात असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नक्की पडतो. पण सगळ्यांचे लाडके धर्मेंद्र पाजी हे सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांशी नेहमीच संपर्कात असतात. सध्या या ही मॅनचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते एका बागेत काम करत आहेत. खरंतर हा फोटो त्यांच्याच फार्म हाऊसमधला आहे. सध्या या ही मॅनने सिने जगताला राम-राम करून शेतीकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे असंच या फोटो आणि व्हिडिओमधून दिसतं.

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्यामागे फुलांची मोठी बाग आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या शेतात काम करणारा माळीदेखील आहे. ज्याला धर्मेंद्र हिरो या नावाने बोलवतात. सध्या त्यांनी त्यांच्या बागेत सेंद्रीय टोमॅटो पिकवलं असल्याचं ते या व्हिडिओतून सांगत आहेत. तर ते त्यांच्या माळीशी मस्तीदेखील करत आहेत.

फोटोमध्ये दुपारच्या उनात धर्मेंद्र शेतात एका खुर्चीवर बसले आहेत. बहूतेक ते शेतकऱ्यांना काहीतरी सुचना करत असावेत. त्यांच्यामागे त्यांनी उगवलेल्या वेगवेगळ्या भाज्या दिसताहेत.

धर्मेंद्र यांनी या पोस्टमध्ये लिहलं आहे की, ‘शेती करणं ही एक कला आहे. यामध्ये सर्वांसोबत काम करण्यातच खरी मजा आहे. काम करणाऱ्याला आणि काम करून घेणाऱ्याला दोघांनाही यात एक वेगळा आनंद मिळतो. हे पिकं म्हणजे काळ्या आईच्या कुशीत त्या ईश्वराने दिलेलं देणं आहे. तुमची साथ आणि प्रेम असंच कायम राहो...मी आता यातच खुष आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 07:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading