S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'डब्बू अंकल' इज बॅक, मिथुनच्या गाण्यावर तुफान डान्स
  • VIDEO : 'डब्बू अंकल' इज बॅक, मिथुनच्या गाण्यावर तुफान डान्स

    Published On: Aug 25, 2018 05:54 PM IST | Updated On: Aug 25, 2018 05:56 PM IST

    भोपाळ, 25 आॅगस्ट : गोविंदाच्या गाण्यावर डान्स करणारे डब्बू अंकल परत आले आहे. आता तर डब्बू अंकलनी मिथुन चक्रवर्तींच्या 'जुली जुली' या गाण्यावर तुफान डान्स केलाय. नेहमी प्रमाणे त्यांची पत्नीही स्टेजवर आहे. त्यांनी हा व्हिडिओ युट्यूबवर टाकला. यावेळी डब्बू अंकलनी असा तुफान डान्स केलाय की व्हिडिओ पाहुन तुमचेही पाय थिरकतील. भोपाळचे राहणारे संजीव श्रीवास्तव हे पेशाने प्राध्यापक आहे. भोपाळच्या भाभा रिसर्च संस्थानमध्ये ते शिकवतात. ते विदिशा इथं राहतात आणि त्यांना प्रेमाने लोकं 'डब्बू' म्हणून ओळखतात. वयाच्या 10 व्या वर्षांपासून त्यांना नृत्याची आवड आहे. त्यांची डान्सची इतकी क्रेझ आहे की काॅलेजमध्ये स्नेहसंमेलनात त्यांच्या डान्सची खास फर्माईश असते. श्रीवास्तव हे गोविंदा, मिथुन चक्रवर्ती आणि जावेद जाफरीचे जबरा फॅन आहे. त्यांनी अनेक नृत्य स्पर्धेत भाग घेतलाय. वयाच्या 45 वर्षीही ते आवडीने नृत्य करतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close