• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : खमंग बिट्ट्यांची लज्जतच न्यारी... काय मग येताय ना बिट्ट्या पार्टीला?
  • VIDEO : खमंग बिट्ट्यांची लज्जतच न्यारी... काय मग येताय ना बिट्ट्या पार्टीला?

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 03:55 PM IST | Updated On: Feb 13, 2019 03:55 PM IST

    'बिट्ट्या' हा पदार्थ विदर्भातला. काही खास कार्यक्रम असला की बिट्ट्यापार्टी आयोजित केली जाते. बिट्ट्यापार्टी विशेषतः रानावनात किंवा एखाद्या धार्मिक स्थळी आयोजित करण्यास प्राधान्य दिलं जातं. गव्हाचं पीठ मळून त्याचे गोळे केले जातात. उकळत्या पाण्यावर वाफवून त्याचे काप केले जातात. हे काप तेलात किंवा तुपात तळल्यानंतर तयार होतात बिट्ट्या. वांग्याची भाजी आणि वरणासोबत त्याचा आस्वाद घेतला जातो. फास्टफूडच्या या काळात खमंग बिट्ट्यापार्टीचा आढावा घेतलाय अकोल्याचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी