• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL VIDEO : पेट्रोलपंपावर बंदुकबाजी, दुकानांची लुट; पाहा या गुंडांचा कहर
  • VIRAL VIDEO : पेट्रोलपंपावर बंदुकबाजी, दुकानांची लुट; पाहा या गुंडांचा कहर

    News18 Lokmat | Published On: Dec 25, 2018 06:57 AM IST | Updated On: Dec 25, 2018 07:11 AM IST

    वैशाली (बिहार), 24 डिसेंबर : बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातील महुआ येथल्या पेट्रोल पंपावर दोन बंदूकधारी गुंडांनी धिंगाणा घातला. हा सर्व प्रकार तेथल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हातात बंदूक घेतलेले दोघेजण पेट्रोल पंपावर बिन्धास्त फिरत असल्याचं CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. एक व्यापारी दुकान बंद करून घरी परतत होता. त्याला लुटण्याच्या उद्देशानं या गुंडांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान, या पेट्रोल पंपावर त्याने पाठलाग करणाऱ्या या गुंडांच्या तावडीतून कसाबशी सुटका केली आणि स्वतःचा जीव वाचवला. हा सर्व प्रकार पाहून पेट्रोल पंपावरचे कर्मचारीसुद्धा तेथून गायब झाले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले खरे. मात्र त्यांच्या हातात काहीच लागलं नाही. अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी