बिग बाॅस 12ची विजेती ठरली दीपिका कक्कड. सुरुवातीला दीपिकावर भरपूर आरोप झाले. ती खोटी आहे, असंही म्हटलं जात होतं. दीपिकानं आतापर्यंत 5 रिअॅलिटी शोजमध्ये भाग घेतला होता. बिग बाॅसमधले टास्क पूर्ण करण्याचाही तिला उपयोग झाला. दीपिकानं इस्लाम धर्म स्वीकारलाय. याच वर्षी 22 फेब्रुवारीला तिनं शोएब इब्राहिमशी लग्न केलं. 2015पासून ती शोएबबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.