S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • VIDEO : भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांचा राडा

    Published On: Jan 27, 2019 06:26 PM IST | Updated On: Jan 27, 2019 06:26 PM IST

    रवि शिंदे, भिवंडी, 27 जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी भिवंडीत भाजपा आमदार महेश चौघुले यांच्या नेतृत्वात भारतमातेच्या पुजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी भिवंडी निजामपूर शहर महापालिकेमध्ये कोट्यवधींचा भष्ट्राचार झाल्याच्या आरोप करत भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राडा घातला. खासदार कपिल पटिल यांचे भाषण सुरु असताना उभ्या असलेल्या काही कार्यकत्यांनी मानवी साखळी तयार करून हातातील बँनर खासदार पाटील यांना दाखवत अपशब्द वापरले. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी संघटनेच्या कार्यकत्यांशी वाद घातला. या वादातून दोन्ही गटात जोरदार राडा झाल्याने पोलिसांना घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यावर सौम्य लाठीमार केला आणि परिस्थीती नियंत्रणात आणली. यात ४ जण किरकोळ जखमी झाले. या घटनेमुळे भिवंडीत काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close