• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भिवंडीत वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाक्या जाळल्या
  • VIDEO : भिवंडीत वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाक्या जाळल्या

    News18 Lokmat | Published On: Dec 30, 2018 09:16 PM IST | Updated On: Dec 30, 2018 09:22 PM IST

    भिवंडी, 30 डिसेंबर : भिवंडीत दुचाक्यांना आगी लावण्याचं सत्र अजूनही सुरुच आहे. भिवंडी शहरातील अंजूर फाटा परिसरातील वाहतूक पोलीस चौकीच्या मागच्या बाजूला काही जप्त केलेल्या दुचाक्या आणि रिक्षा ठेवलेल्या होत्या. अज्ञात इसमाने आग लावल्याने वाहतूक पोलसांनी जप्त केलेल्या या गाड्यांपैकी 6 दुचाक्या, 1 रिक्षा आणि एक झाड जळून खाक झालं आहे. घरासमोर आणि पार्किंगमध्ये ठेवलेल्या दुचाक्यांना अज्ञात इसमाकडून जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी भिवंडीत तीन महिन्याच्या आतली अशा प्रकारची नववी घटना समोर आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी पोहोचली. मात्र, तोवर 6 दुचाक्या, 1 रिक्षा आणि एक झाड आगीच्या भक्षस्थांनी पडलं होतं. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी