पाटणा,ता.29 जुलै : बिहारची राजधानी पाटण्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने कहर केलाय. संततधार सुरूच असल्याने अनेक भागात पाणी घुसलं. इथल्या प्रसिद्ध नालंदा हॉस्पिटलमध्येही पाणी घुसलं, त्या पाण्यात मासे आणि किडे आल्यामुळे रूग्णांचं आरोग्यच धोक्यात आलंय. पाण्यात मासे स्पष्ट दिसत असून डॉक्टर आणि नातेवाईकांना त्या पाण्यात राहूनच रूग्णांची सुश्रुशा करावी लागत आहे. त्यामुळे रूग्णांचे हाल झाले. नालंदा हे पाटण्यातलं दुसरं मोठं हॉस्पिटल आहे.