• VIDEO: संजय निरुपम यांची घोषणाबाजी सुरूच...

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2018 11:09 AM IST | Updated On: Sep 10, 2018 11:09 AM IST

    10 सप्टेंबर : गेल्या 16 ते 17 दिवसांपासून देशाची जनता इंधन दरवाढीची झळ सोसतेय आणि याच इंधन दरवाढीविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेकाप, डावे पक्ष, बसपा आणि पीपल रिपब्लिकन पक्षानं पाठिंबा दर्शवला आहे. अंधेरी स्थानकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकल रोखण्यात आली. या आंदोलनानंतर अशोक चव्हाण, संजय निरुपम, माणिकराव चव्हाण यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. अधेरीहून डीएन नगर पोलिसस्थानकात पोलिस गाडीतून रवानगी करण्यात आली. यावेळी संजय निरुपम यांनी मोदींविरोध जोरदार घोषणाबाजी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading