मुंबई, 10 जुलै : पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव भागात आज तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. यात दोन बाईकस्वार आणि बेस्ट बसमधल्या एका प्रवाशामध्ये तुफान मारामारी झाली. एवढंच नाहीतर यात एका दुचाकीस्वारानं प्रवाशाला मारायला पेव्हर ब्लॉकही हातात घेतला होता. मात्र, बाजूला असलेल्या इतर व्यक्तींनी त्याला रोखलं. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झालाय.