• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसेनेचं ठिय्या आंदोलन; 60 फूट खोल विहिरीत उतरले शेतकरी
  • VIDEO : शिवसेनेचं ठिय्या आंदोलन; 60 फूट खोल विहिरीत उतरले शेतकरी

    News18 Lokmat | Published On: Jan 7, 2019 07:22 PM IST | Updated On: Jan 7, 2019 07:22 PM IST

    बीड, 7 जानेवारी : बीड तालुक्यातील कुटेवाडी येथे 60 फूट खोल विहिरीत शेतकऱ्यांसह शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात काही महिला देखील सहभागी झाल्या आहेत. ही विहीर कोरडी असून, दुष्काळी उपाययोजनांच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू होणार नाहीत तोपर्यंत विहिरीतून बाहेर येणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. खोल विहिरीत बसून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू असल्यामुळे स्थानिकांनी विहिरीभोवती गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी