• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण
  • VIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jan 21, 2019 08:41 PM IST | Updated On: Jan 21, 2019 08:41 PM IST

    बीड, 21 जानेवारी : उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार विनायक मेटेंचे नाव का नाही छापलं? असे म्हणत मेटेंच्या कार्यकर्त्याने एका डॉक्टरला बेदम मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार तेथील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डॉ. पाखरे यांनी प्रजासत्ताक दिनी बीड शहरातील नगर नाका येथे त्यांच्या दाताच्या दवाखान्याचं उदघाटन ठेवलं होतं. मात्र उदघाटन पत्रिकेत विनायक मेटेंचं नाव का टाकले नाही? या कारणावरुन मेटे समर्थक राहुल आघाव याने त्यांना मारहाण केली. या घटनेमुळे विनायक मेटेंच्या समर्थकांची दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, राहुल आघाव याच्या विरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी