• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा -उद्धव ठाकरे
  • VIDEO : युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा -उद्धव ठाकरे

    News18 Lokmat | Published On: Jan 9, 2019 07:40 PM IST | Updated On: Jan 9, 2019 07:42 PM IST

    बीड, 9 जानेवारी : ''युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी माझ्या शेतकऱ्यांचं काय करता हे सांगा'', अशा कडक शब्दात शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला फैलावर घेतलं. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी ते आज (9 जाने.) बीडमध्ये बोलत होते. ''आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे'', असा टोलाही त्यांनी यावेळी सरकारला लगावला. ''केंद्राचं पाहणी पथक केवळ गाजर दाखवण्याचं काम करतं'', असा हल्लाही उद्धव ठाकरेंनी यावेळी चढवला. पीकविमा योजनेतील भ्रष्टाचाराचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि पाणी टँकर वाटप करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी युतीची चर्चा गेली खड्ड्यात आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अशा शब्दांत भाजपावर टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी