• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दुष्काळाचं दुष्टचक्र : आता या गावात उरली आहेत फक्त वृद्ध मंडळी
  • VIDEO : दुष्काळाचं दुष्टचक्र : आता या गावात उरली आहेत फक्त वृद्ध मंडळी

    News18 Lokmat | Published On: Dec 1, 2018 08:00 PM IST | Updated On: Dec 1, 2018 08:00 PM IST

    शशी केवडकर, बीड, 1 डिसेंबर : बीड जिह्यातलं पांगरी हे मुख्यत्वे ऊसतोड मजुरांचं गाव. या गावातली माणसं ऊसतोडीसाठीच बाहेर पडतात. पण आजमितीला या पांगरीसह जिह्यातील 50 गावांतील लोकांना प्यायलाही पुरेसं पाणी नाहीये. तर जिल्ह्यात बहुतांश भागात लागवड करण्यात आलेला ऊस हा पाण्याअभावी वाळून गेला आहे. उन्हाळ्यापूर्वीच जाणवणाऱ्या दुष्काळाच्या तीव्र झळांमुळे पांगरी, खोपटी या गावतील तरुण मंडळींनी आपल्या बायका-मुलांसह शहरं गाठलंय. पोटापाण्यासाठी गावातली कर्तीधर्ती मंडळी महानगरांकडे स्थलांतरित झाल्याने, आता या गावांत उरली आहे ती फक्त वृद्ध मंडळी. आयुष्यभर हाडाची काडं करुन जगणाऱ्या या वृद्धांवर केवळ दुष्काळी परिस्थितीमुळे एकटं राहण्याची वेळ आली आहे. पांगरी प्रमाणेच खोपटी या गावातल्या तरुणांनीही दिवाळी संपताच रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या शहरांकडे धाव घेतली आहे.... पाहू या दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या बीड जिल्ह्यावर आधारित एक स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी