VIDEO : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारा, हाच तो व्हिडिओ

VIDEO : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारा, हाच तो व्हिडिओ

  • Share this:

जळगाव, ता.14 जून : मालकीच्या विहिरीवर पोहायला का गेलात या कारणावरून दोन मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढून  मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जामनेर तालुक्यातल्या वाकडी गावात ही घटना घडलीये.

हाच का पुरोगामी महाराष्ट्र? विहिरीत पोहल्यानं मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड

या प्रकरणी तब्बल तीन दिवसांनी बुधवारी मध्यरात्री संबंधीत दोन जणांविरुद्ध पहुर पोलीस स्टेशनमध्ये अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं ?

मातंग समाजाच्या मुलांची धिंड प्रकरण, तक्रार मागे घेण्यासाठी पालकांवर दबाव?

गावातल्या शेतात रविवारी ही मातंग समाजाची दोन मुलं पोहण्यासाठी उतरली होती. ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतातील विहिरीवर ते गेले होते. या शुल्लक कारणांवरून ईश्वर बळवंत जोशी आणि प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांनी या दोन मुलांच्या अंगातील कपडे काढून नग्न केले आणि त्यांना पट्याने जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांची धिंडही काढली.

वाकडी गावातील मराठी शाळेजवळ कर्णफाट्यावर रविवारी सकाळी दहा वाजता घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं शेवटी पोलिसांनी कारवाई केली.

First Published: Jun 14, 2018 07:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading