S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक
  • VIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2018 11:58 PM IST | Updated On: Aug 20, 2018 12:01 AM IST

    जकार्ता, 19 ऑगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातलीये. कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हे सुवर्णपदक माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया त्यांने न्यूज18 लोकमतला दिली. बजरंगने जपानच्या तकातानीला 10-8 ने धोबीपछाड देत सुवर्णपदक पटकावले आहे. बजरंग पुनिया आणि आणि जपानच्या तकातानीमध्ये रोमहर्षक सामना रंगला. पण बजरंग पुनियाने जबरदस्ती खेळी केली. तकातानीचा प्रत्येक डाव त्याने मोडीत काढला. बजरंगने 8-6 अशी आघाडी कायम ठेवली होती. बजरंगने तकातानीला आस्मान दाखवत दोन अंकाची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या विजयामुळे आशिया क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. हे सुवर्णपदक मी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित करत असल्याचे त्याने न्यूज18 लोकमतला सांगितले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close