S M L

ओडिशात जन्मला 'बाहुबली' !

आश्चर्य वाटून घेऊ नका कारण हा आहे नंदनकाननमध्ये जन्माला आलेला 'बाहुबली', हा वाघाचा नवा बछडा.

Samruddha Bhambure | Updated On: May 11, 2017 04:39 PM IST

ओडिशात जन्मला 'बाहुबली' !

11 मे : ओडिशातल्या नंदनकानन प्राणीसंग्रहालयात  'बाहुबली' जन्माला आला आहे. आश्चर्य वाटून घेऊ नका कारण हा आहे नंदनकाननमध्ये जन्माला आलेला 'बाहुबली', हा वाघाचा नवा बछडा.

'बाहुबली' प्रदर्शित होऊन आता दोन आठवडे झालेत, पण तरीही 'बाहुबली'चा फिव्हर काही उतरला नाहीये. फक्त देशभरातच नाही तर जगभरात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतीये. मग ते बाहुबली प्रिंटच्या साड्या असो किंवा बाहुबलीच्या नावाने खपवले जाणारे अन्य प्रोडक्ट्,  सर्वत्र सध्या बाहुबलीचीच चर्चा आहे. आता वस्तूप्रमाणे एखाद्या मुलाचं नामकरणच 'बाहुबली'च्या नावाने करायचं बाकी होतं, पण ती कसरही नंदनकान संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी भरून काढली आहे.

ओडिशा इथल्या नंदनकान संग्रहालयात काही महिन्यांपूर्वी वाघिणीने 7 बछड्यांना जन्म दिला. या संग्रहालयात बछडे जन्माला आले की त्यांचं नाव काय ठेवायचं हे छोट्या मुलांना विचारलं जातं. यासाठी आजूबाजूच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून नावं मागवली जातात आणि जे नाव सर्वाधिक लोकप्रिय असेल ते नाव ठेवलं जातं. पण यावेळी  मात्र इथल्या कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना नाव सुचवण्याचं आवाहन  केलं.

पर्यटकांनीही याला चांगला प्रतिसाद दिला. पण सगळ्यांच्याच तोंडी 'बाहुबली'चंच नाव असल्याने, जवळपास अडीच हजारांहून अधिक लोकांनी या बछड्याचं नाव 'बाहुबली' असं सुचवलं. मग काय, संग्रहालय प्रशासनानेही बहुमताचा मान राखत या बछड्याचं नामकरण 'बाहुबली' असं केलं. तर इतर सहा बछड्यांची नावं कुंदन, आद्य, साहिल , विकी , सिनू आणि मौसमी अशी ठेवण्यात आली आहेत.

Loading...
Loading...

दरम्यान, जशी 'बाहुबली' पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात तुफान गर्दी केली होती तशीच या बाहुबलीला देखील पाहण्यासाठी लोक गर्दी करतील अशी आशा इथल्या कर्मचाऱ्यांना वाटतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 03:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close