बाहुबलीला मारण्यासाठी कटप्पाला किती मिळाले पैसे?

बाहुबलीला मारण्यासाठी कटप्पाला किती मिळाले पैसे?

'बाहुबली 2' म्हणजे बाॅक्स आॅफिसवरचा झंझावातच. सध्या कलाकारांच्या सिनेमातल्या मानधनाचा एक व्हिडिओ वायरल झालाय.

  • Share this:

03 मे : 'बाहुबली 2' म्हणजे बाॅक्स आॅफिसवरचा झंझावातच.  एका दिवसातच कमाईची अनेक रेकाॅर्डस सिनेमानं मोडली. सिनेमातल्या प्रत्येक कलाकाराचं काम एकदम परफेक्ट. सध्या कलाकारांच्या सिनेमातल्या मानधनाचा एक व्हिडिओ वायरल झालाय.

सिनेमाचा हिरो प्रभासला मिळालेत 25 कोटी रुपये, तर बाहुबलीला मारण्यासाठी कटप्पाला मिळालेत 2 कोटी रुपये.

देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टीला मिळालेत 5 कोटी रुपये आणि तमन्ना भाटियाचं फारसं काम नसतानाही तिलाही तेवढेच रुपये मिळालेत. शिवगामी देवी म्हणजेच राम्या कृष्णाला 2.5 कोटी मिळालेत.

खलनायक भल्लालदेव म्हणजेच राणा दाग्गुबातीला 15 कोटी दिलेत.

बाहुबली 2 रेकाॅर्डब्रेक करणारा दिग्दर्शक राजामौलीला मिळालेत 28 कोटी रुपये.

पण कलाकारांच्या या मानधनापेक्षा त्यांना रसिकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद, प्रेम खूपच मोठं आहे. बाहुबलीची लार्जर दॅन लाइफ प्रतिमा, भव्यता, कलात्मकता आणि कलाकारांनी समरसून केलेला नैसर्गिक अभिनय यानं बाॅक्स आॅफिस गाजवलंय.

कटप्पानं बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर तर सिनेमानं दिलंय. पण या व्हिडिओतून कलाकारांच्या मानधनाची कल्पना प्रेक्षकांना येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 05:39 PM IST

ताज्या बातम्या