• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्याला मनसेसैनिकाच 'खळ्ळ-खट्याक'
  • VIDEO: विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्याला मनसेसैनिकाच 'खळ्ळ-खट्याक'

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2018 09:16 PM IST | Updated On: Jul 17, 2018 09:16 PM IST

    गणेश गायकवाड, बदलापूर, 17 जुलै : बदलापूरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेतील कर्मचाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यानी बेदम चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. एका चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याच्या आरोपावरून बदलापूर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कर्मचाऱ्याला बेदम चोप दिला आहे. पोलिसांसमोरच मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कर्मचाऱ्याला बेदम चोप दिला. या संबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्यानंतर शाळेने त्या कर्मचाऱ्यावर कारवाई न केल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेतील मुख्याध्यापकांच्या केबिनमध्येच कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोणतीही तक्रार न आल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading