• होम
  • व्हिडिओ
  • पुतळ्याच्या चौथऱ्यावरून 'तो' थेट महापौरांच्या अंगावर पडला; अंगावर शहारा आणणारा VIDEO
  • पुतळ्याच्या चौथऱ्यावरून 'तो' थेट महापौरांच्या अंगावर पडला; अंगावर शहारा आणणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jan 24, 2019 09:11 PM IST | Updated On: Jan 24, 2019 09:11 PM IST

    धुळे, 24 जानेवारी : महानगरपालिकेचे महापौर चंद्रकांत सोनार यांचे स्वच्छता अभियान एका नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. महापौर सोनार यांनी सकाळी शहरातल्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत पारोळा रोड चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता सुरू होती. यावेळी अमोल गणेश रनायते हा महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी वर चढत असताना खाली पडला. अमोल पुतळ्याच्या कठड्यावरून थेट महापौर सोनार यांच्या अंगावर येऊन पडला. जमिनीवर पडताच तो बेशुद्ध झाला. त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. त्याला तात्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमोल पुतळ्याच्या चौथऱ्यावरून थेट महापौरांच्या अंगावर पडल्याचे हे दृश्य अंगावर शहारा आणणारे आहे. महापालिकेचे कर्मचारी हजर असताना, एका नागरिकाला पुतळ्यावर का चढू दिले गेले? हा प्रश्न या निमित्ताने आता समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी