• जळगांव येथील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 8, 2013 02:07 PM IST | Updated On: May 14, 2013 03:51 PM IST

    07 एप्रिलजळगांव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. अख्खा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपाळून निघालाय. हंडाभर पाण्यासाठी जनतेला वणवण भटकावे लागत आहे. असं असताना अजित पवार तुम्हाला असं बोलायला लाज कशी वाटली नाही.पैशाच्या बळावर मतदाराला विकत घेता येईल असं प्रत्येक निवडणुकीत करत आले. अजित पवारांना पैशाचा माज आहे येत्या निवडणुकीत मतदार अजित पवारांना 'मत' नाही 'मूत' देतील अशी विखारी टीका राज ठाकरे यांनी केली. अजित पवारांचे बेताल व्यक्तव्य म्हणजे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जनतेची थट्टा असल्याचंही राज ठाकरे यांनी या सभेत म्हटलं. दरम्यान, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या मुद्दयाला पुन्हा हात घालत मराठी माणसाला नोकरीत 100 टक्के आरक्षण मिळायलाच हवं हे पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. जळगावचे लोकप्रतिनिधी सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे करोडो रुपये खर्च करुन आमदार विकत घेतात असा सणसणीत आरोपही त्यांनी केला. तसंच महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नासाठी हे नेते कधी एकत्र आले नाही. आता हे नेते मराठा आरक्षणासाठी एकत्र आले आहे. मराठा आरक्षणाची मागणी करताय पण निवडणुकांना सामोर ठेवून जनतेची माथी भडकावण्याची काम ही नेते करत आहे अशी टीका करत मराठा आरक्षणाला त्यांनी विरोध दर्शवला. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौर्‍याची सांगता आज जळगावमधल्या जाहीर सभेनं झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी