S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • इम्पॅकटफुल 5 वर्ष:प्रतिकने केला यशस्वी 'गोल' !
  • इम्पॅकटफुल 5 वर्ष:प्रतिकने केला यशस्वी 'गोल' !

    Published On: Apr 6, 2013 01:19 PM IST | Updated On: May 15, 2013 01:46 PM IST

    05 एप्रिलबातम्या तर सारेच दाखवतात पण आम्ही त्यासोबत घेतो बातमीमागील बातमीचा वेध... उदयोन्मुख फुटबॉलपटू प्रतिक शिंदेचा फुटबॉल प्रवास म्हणजे जिद्द आणि संघर्षाची अनोखी कहाणीच... संघर्षाच्या त्याच्या प्रत्येक टप्यावर त्याला साथ लाभली ती आयबीएन लोकमतची... चेंबुरच्या एका वस्तीत प्रतिक शिंदे आपल्या आईसोबत राहतो, आई शेजारी धुणीभांडी करून घरचा खर्च जेमतेम चालवायची. प्रतिकला फुटबॉलची आवड, आईनं त्याची ही आवड जोपासायचं ठरवलं. आणि प्रतिकनंही आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवला. क्लब फुटबॉलच्या माध्यमातून त्यानं स्पेन आणि स्विडनचा स्पर्धात्मक दौरा केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं कौशल्य सिद्ध केल्यावर प्रतिकला अमेरिकेत फुटबॉलचं अद्ययावत प्रशिक्षण घेण्याची संधी आयती चालून आली. पण प्रश्न होता तो पैशाचा...आयबीएन लोकमतनं प्रतिकची व्यथा समाजापुढे आणली आणि मदतीचे हजारो हात पुढे आले. अमेरिकेतील या कोचिंगनंतर प्रतिकला आता हॉस्टोल हुरिकनन्स करारबद्ध केलंय. प्रतिकच्या संघर्षाची बातमी देऊन केवळ आम्ही थांबलो नाही तर त्याच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहिलो, कारण आम्ही बांधील आहोत सच्चा पत्रकारितेसाठी.अमेरिकेतील पहिल्या टप्याचं प्रशिक्षण संपवून प्रतिक नुकताच मुंबईत परतालाय. काही दिवसात तो पुन्हा अमेरिकेला रवाना होणार आहे. आम्ही जाणून घेतलं त्याच्या या यशस्वी वाटचालीतलं आयबीएन लोकमतचं योगदान...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close