• VIDEO: खोतकर आणि दानवेंची दिलजमाई होणार का? 

    News18 Lokmat | Published On: Mar 4, 2019 02:44 PM IST | Updated On: Mar 4, 2019 02:44 PM IST

    अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंच्या दिलजमाईसाठी भाजपचे प्रयत्न सुरूच आहेत. आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अर्जन खोतकर यांच्या घरी जाऊन दानवे आणि खोतकर या दोघांचीही भेट घेतली. यावेळेस या तिघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली. आता याबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री हेच अंतिम निर्णय घेणार आहेत. जालन्यातून अर्जुन खोतकर हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र युती झाल्यामुळे ही जागा दानवेंकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यावरूनच दानवे विरुद्ध खोतकर असा संघर्ष सुरू झाला होता. आता सुभाष देशमुखांची मध्यस्थी यशस्वी ठरते का हे पाहावं लागेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी